( One of my very first poems in Marathi.
Editing courtesy: Ms. Neha Patil )
हरी पाहुनी वरती ,
विचारतो रागाने -
अश्रू थांबवूनी डोळ्यातले ,
आकाशी ओरडतो जोराने .
कां केले असे ?
असे करून काय मिळाले ?
स्वतःच्या स्वार्था साठी ,
कां बनवलीस ही सृष्टी .
आणि मन भरल्यावर तिच्याने ,
वाळीत अशी कां टाकलीस .
तू दुःख कां बनविले ,
कां घडविला विनाश .
जर मृत्यू द्यायचाच होता शेवटी ,
तर कां आनंद पस्रविलास .
अपराध निर्माता रे तू ,
किती मोठा अपराधी !
वेदना देतांना तुला ,
काहीच वाटले का नाही .
जग बनवणाऱ्याला ,
ह्या जगात शिक्षा नाही .
आणि ज्यांना शिक्षा होत आहे ,
त्यांची काही चूकच नाही .
बोल हरी बोल !
गप्प कां राहिलास ?
हे कसं जग बनवलस ?
न्याय कुठला हा पाळलास .
उत्तर काही न येता ,
थांबले नाही अश्रू आता .
हरी बोलला स्वतःशी -
झाली चूक , घडला गुनाह .
पण दुःख ह्याचे जास्त वाटते ,
चूक कळाली मला ,
पण उशीर फार झाला .
आता माझ्या खांद्यांवरच्या ,
माझ्या ह्या दोषांचे भार,
अनंत काळा साठी ,
मी एकटाच उचलणार ,
एकटाच उचलणार ...
-TheDreamer
वैभव ...
ReplyDeleteअप्रतीम ...खूपच छान ...
कसं काय सुचतं तुला.
आणी मराठीतला हा पहिला प्रयत्न तर अती उत्तम...